पुणे शहर

वटपौर्णिमेसाठी कोथरूड परिसरात योगेश मोकाटे यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी वडाच्या झाडाची रोपे

वटपौर्णिमेला महिलांना वटपुजनासाठी वडाची रोपे उपलब्ध करून दिली.

पुणे : वटपौर्णिमा उत्सवानिमित्त सर्व माता-भगिनींना पुजा करण्यासाठी कोथरुड परिसरांत माजी नगरसेवक ॲड योगेश मोकाटे यांच्या वतीने कोथरुड परिसरांत विविध सोसायटी तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी कुंडीत लागवड केलेली वडाच्या झाडाची रोपे पुजेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली.

महिलाभगिनींनी या संधीचा लाभ घेत मनोभावे वटवृक्षाचे पुजन करीत आनंद व्यक्त केला.दरवर्षी वटपोर्णिमेला महिलांना वटपुजन करण्यासाठी घरापासुन दुर अंतरावर वडाचे झाड शोधावे लागते. ही गैरसोय दुर व्हावी म्हणुनच वटवृक्ष ठिकठिकाणी उपलब्ध करुन दिल्याचे ॲड.योगेश मोकाटे यांनी सांगितले.

Img 20220610 wa0330

कोथरुडमधील तेजसनगर,डहाणुकर कॉलनी विकास मंडळ मैदान,मंत्री पार्क,डीपी रस्ता,गणंजय सोसायटी,शास्त्रीनगर,गुजरात कॉलनी,भेलकेनगर,कोथरुड गावठाण,छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौक परिसरांत विविध ५० ठिकाणी वटवृक्ष पुजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपन करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले. काही ठिकाणी नागरिकांच्या ईच्छेनुसार हीच रोपे त्यांच्या परिसरात लावुन त्याची जबाबदारी संबंधित रहिवाशी नागरिक घेणार आहेत.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये