पुणे शहर

पर्यावरण दिनानिमित्त पाषाण-सुतारवाडी परीसरात विविध कार्यक्रम.

पाषाण ‌: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाषाण-सुतारवाडी परीसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,त्यात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

सुस रोड येथील आदिशक्ती योग भवन परिसरातील मैदानात वृक्षारोपण करण्यात आले तसेच, येथील मैदानाची स्वच्छता करण्यात आली. वसुंधरा स्वच्छता अभियान व पाषाण एरिया सभेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे महापालिका आरोग्य विभाग यांच्या वतीने स्वच्छतेबाबत जनजागृतीपर प्लागेथाॅन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य क्लब, मनपा आरोग्य कर्मचाऱी यात सहभागी झाले होते.
अर्थ डे संस्था व राॅयल इंन्फिल्ड याच्या वतीने राम नदी परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्लास्टिक कचरा, काचेच्या बाटल्या, निर्माल्य आदी कचरा यावेळी गोळा करण्यात आला. परिसरातील पर्यावरण कसे स्वच्छ राहील, त्याचे कसे संवर्धन करण्यात येईल, राम नदी, पाषाण तलाव, परिसरातील मैदानं, टेकड्या कशा सुरक्षित ठेवता येतील या विषयी जनजागृती करण्यात आली.

Img 20220603 wa0217
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये