पुणे शहर

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहू नगरीत सुरू आहे. या कामाचा आढावा आज भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतला. तसेच, पाटील यांनी यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात जाऊन, महाराजांचे दर्शन घेतले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिल्या.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वारकरी बांधव येणार असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले, आ. राहुल कुल, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, आशाताई बुचके, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20220603 wa0217
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये