पुण्यातील परांजपे बिल्डरवर मुंबई पोलिसांची कारवाई ; बिल्डरला घेतले ताब्यात

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. Mumbai Police action on Paranjape Builder in Pune
पुण्यातील प्रसिध्द अशा परांजपे बिल्डरला मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत आहे. श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय 63) आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय 59) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. वसुंदरा डोंगरे यांच्या तक्रारीनुसार फसवणूक प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. Mumbai Police action on Paranjape Builder in Pune
फिर्यादी वारस असलेली जागा विक्री करत असताना फिर्यादी यांना कळू न देता विक्री केली असल्याचे समोर आल्याने फिर्यादी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याबाबत आज विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटेदस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे.



