
भाजपच्या वतीने नवनिर्वाचित लीडर्स आणि अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांचा सन्मान
पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉइज युनियन (Kirloskar Cummins Employees Union) च्या सर्व नवनिर्वाचित लीडर्स आणि अध्यक्ष महेंद्र बालवडकर यांचा भाजप ओबीसी आघाडी शहर सरचिटणीस विनोद मोहिते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रसंगी सर्व नवनिर्वाचित सदस्य ऊपस्थित होते. तसेच राजाभाऊ गांधले , महेंद्र कुडले व साईनाथ तरुण मंडळाचे अनिल शिंदे , दत्ताभाऊ माने ,किशोर नलावडे , विकी मोरे , हनुमंत चौगुले , विजय दौंडकर , कैलास देवकर ऊपस्थित होते.
या कंपनीत नुकत्याच झालेल्या कामगार युनियनच्या निवडणूकीत किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज् युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजी मारली. यानिमित्ताने भाजपच्या वतीने भाजप सरचिटणीस विनोद मोहिते आणि भाजप कार्यकर्त्यांनी या नवनिर्वाचित सदस्यांचा सन्मान करण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली.
मोहिते म्हणाले, कोथरूड परिसरातील नागरिकांच्या जीवनात कमिन्स कंपनीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. १० हजारांहून अधिक कामगार क्षमता असणाऱ्या या कंपनीने कोथरूड, कर्वेनगर भागातील हजारो हातांना रोजगार दिला आहे. त्यांची कुटुंब सावरली. .




