भारतीय लोकांमध्ये व्हिट्यामिन ‘ड’ ची मात्रा कमी असणे ही चिंतेची बाब ; जागतिक व्हिट्यामीन डी दिवस

आज २ नोव्हेंबर म्हणजेच जागतिक व्हिट्यामिन ड दिवस. खरंच असाही काही दिवस असू शकतो हे मला पण फारसं माहित नव्हतं. आज जगभरात व्हिट्यामिन ‘ड’ च्या कमतरतेमुळे असंख्य लोकांना हाडांचे आजार व फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारता सारख्या विकसनशील देशात सुर्य प्रकाश मिळणे तसे अवघड नाही पण जगातील बऱ्याच देशामध्ये सुर्यप्रकाश मिळणे अवघड आहे. स्वच्छ सुर्य प्रकाशामध्ये वावरल्यामुळे फिरल्यामुळे हे व्हिट्यामिन ड सहजपणे आपल्या शरीरात तयार होऊ शकते.त्यामुळे भारता सारख्या विकसनशील देशात ही व्हिट्यामिन ‘ड’ ची मात्रा लोकांमध्ये कमी असणे ही एक चिंतेची बाब आहे.
आज दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांपैकी बऱ्याच रूग्णांना व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता दिसून येते. वयोमानानुसार व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता दिसून येणे स्वाभाविक आहे. पण आजमितीला तरूण वयात ही व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता दिसून येणे ही फार चिंतेची बाब आहे. कंबरदुखी, गुडघेदुखी, मान, पाठ , हात, कोपरा, खांदा दुखणे, थोडे वजन हाता मध्ये घेऊन चालले तर लगेच खांदा हात दुखणे, टाच दुखणे अशी बरीच लक्षणे ही व्हिट्यामिन ‘ड’ च्या कमतरतेमुळे असंख्य लोकांना जाणवतात..

आजार, दुखणे कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे घेणे ठिक आहे पण आजाराचे कारण समजावून घेणे आवश्यक आहे. जर व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता असेल तर ती भरून येणे दुखणे कमी करण्यासाठी गरजेची आहे. साधारणपणे कोवळ्या उन्हात सकाळी अथवा आपल्याला जमेल त्यावेळी उन्हात फिरले, अथवा काम केले तर नैसर्गिक प्रक्रियेदूवारे व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता कमी होऊ शकते. आहारा द्वारे सुद्धा आपण व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता भरून काढू शकतो. प्रामुख्याने मासे, मश्रूम, अंडी, दुध, दही, बटर, लोणी अशा आहारामधून सुद्धा आपल्याला व्हिट्यामिन ड ची गरज भागवता येते.



साधारणपणे आपल्या शरीराला 400 ते 800 IU International Unit प्रतिदिन व्हिट्यामिन ड ची गरज असते. लहान मुले व गरोदर स्त्रियांना ह्याची गरज थोडी जास्त असते. स्वच्छ सुर्य प्रकाश व आहारामधून सहज मिळणारे हे व्हिट्यामिन ड आज मात्र असंख्य लोकांच्या शरिरात कमी प्रमाणात सापडत आहे. परिणामी हाडांचे आजार व फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण वाढते आहे. हाडाच्या आजारा व्यतिरिक्त..मानसिक चिडचिड होण्याचे प्रमाण व भिती वाटणे, (Anxiety Depression) अश्या बर्याच आजारांमध्ये व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता दिसून येते. काही रूग्णांना केस गळणे, टक्कल पडणे, हे पण ह्या व्हिट्यामिन्सच्या कमतरतेमुळे जाणवते.
ज्या रूग्णांना सततची कंबरदुखी, गुडघेदुखी, मानपाठ दुखणे, हात दुखणे, थोडेजरी काम केले की थकवा जाणवणे. ज्या लोकांना मधूमेह, उच्चरक्तदाब, थाॅयराईड चा आजार. अती असणारे वजन, स्थुलपणा अशा रूग्णांनी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊन शरिरातील व्हि वीट्यामिन ‘ड’ ची मात्रा तपासून घ्यावी व त्यानुसार औषधे सुरू करावीत. ठराविक कालावधीत मध्ये व्हिट्यामिन ‘ड’ च्या औषधांमुळे शाररिक तक्रारी कमी होण्यास मदत होईल.
सध्या जगभरात असणाऱ्या कोरोना संसंर्ग आजारावरील उपचार मध्ये सुद्धा ह्या व्हिट्यामिन ड चे महत्व जागतिक स्तरावर सिद्ध झाले आहे. खरंच एक प्रकारे शाररिक क्षमता Immunity Booster म्हणून हे व्हिट्यामिन ड काम करते. आज बंद घरा मध्ये काम करणे, वातानुकूलित खोल्यांमध्ये, ऑफिसमध्ये काम करणे, बाहेर फिरताना संपूर्ण शरिर झाकून ठेऊन फिरणे ( उन्हामुळे चेहरा काळा पडू नये म्हणून) ह्या अशा बऱ्याच गोष्टीमुळे हे व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता दिसून येते. महिलांमध्ये जास्त करून ह्या व्हिट्यामिन ड ची कमतरता दिसून येते.
चला तर मग आज जागतिक व्हिट्यामिन ‘ड’ दिवसच्या निमित्ताने व्हिट्यामिन ड युक्त आहार, नियमित व्यायाम,व थोडासा स्वच्छ सुर्य प्रकाश ( सुर्य प्रकाशात कामं करणे..चालणे) घेऊयात व व्हिट्यामिन ‘ड’ ची कमतरता कमी करण्यासाठी प्रयत्न करूयात.
डाॅ. सचिन नागापूरकर
अस्थी रोग तज्ञ, हर्डीकर हाॅस्पीटल



