महाराष्ट्र

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, पुणे, शिरूर, मावळ मध्ये 13 मे रोजी मतदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि 4 जूनला निकाल जाहीर होईल. सध्याच्या लोकसभेची मुदत 16 जूनपर्यंत संपत आहे. 6 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीची सगळी प्रक्रिया संपुष्टात येईल. त्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे या पाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी निवडणुकीचा प्रचार कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?

पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ – 8) 

तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – 11 )

चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ – 11 )

पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ – 13 )

Img 20240202 wa00032332203558256672939
Img 20240202 wa00042210657172365864812
Img 20240202 wa00026664518766032457834

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये