ह.भ.प मारुती (बुवा) लक्ष्मण दसवडकर यांना विठ्ठल रुक्मिणी मंडळाच्या वतीने भक्ती शक्ती पुरस्कार..

कर्वेनगर : कर्वेनगर भागातील ज्येष्ठ वारकरी ह.भ.प मारुती (बुवा) लक्ष्मण दसवडकर यांचा भालेकरनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंडळाच्या वतीने भक्ती शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दसवडकर यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
दसवडकर परिवार, समस्त ग्रामस्थ वरसगाव, गोरडवाडी पुनर्वसन कानगाव यांच्या वतीने ह.भ.प मारुती (बुवा) लक्ष्मण दसवडकर यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी मंडळाने त्यांनी केलेल्या वारकरी सेवेबद्दल त्यांचा उचित सन्मान केला. यावेळी ह.भ.प चंद्रकांत महाराज वांजळे यांची कीर्तन सेवा पार पडली. या प्रसंगी मृदंगाचार्य पांडुरंग आप्पा दातार यांची विशेष उपस्थित होती.

यावेळी चेतन भालेकर, राजाभाऊ भालेकर, भगवान चव्हाण, दिलीप जगताप, लक्ष्मण दसवडकर, बाळासाहेब बदडे, गुलाब भुजबळ, संजय पाटील, बाळासाहेब शिंदे, रामचंद्र वालगुडे, राहुल भालेकर, मंगेश जगताप, रोहित चव्हाण, उमेश भालेकर, हनुमंत दाभेकर, बाळासाहेब भालेकर, अशोक सोमवंशी, उत्कर्ष दिघे उपस्थित होते.





