पुणे शहर

पुणेकरांनो गुरुवार ऐवजी शुक्रवारी पाणी बंद

पुणे :  गुरूवार दिनांक ७ जानेवारी रोजी  दुरुस्तीच्या कामानिमित्त पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार होता, मात्र  महापालिकेने काही तांत्रिक कारणामुळे आता गुरुवार ऐवजी शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेऊन दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

लग्नाची तारीख मोठी असल्याने गुरुवारी पाणी बंद ठेऊ नये अशी मागणी नगरसेवकांनी केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  त्यामुळे आता गुरुवार ७ जानेवारी ऐवजी शुक्रवारी दिनांक ८ जानेवारी रोजी पाणी बंद राहणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये