कोथरुड

मेगासिटीतील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटणार : दीपक मानकर

कोथरुड : मेगासिटीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. पण आता येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असून नगरसेवक दीपक मानकर यांच्या प्रयत्नातून मांडके कॉलेज ते मेगा सिटी अशी चाळीस मीटर लांब व सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

चार महिने पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे तेथील रहिवाशांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या काळात तांत्रिक अडचणींमुळे महापालिकेची कामे बंद असल्यामुळे मानकर यांच्याकडून गेली चार महिने रोज चार टॅन्कर पाठवून मेगासिटी मधील पाण्याची गरज भागवली जात होती.

भविष्यात पाण्याचा दाब कमी होवून पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कायमचा मार्ग काढीत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून हर्षवर्धन मानकर यांनी या कामाची पाहणी करुन आढावा घेतला. या नवीन जलवाहिनी मुळे मेगासीटीतील नागरीकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना दीपक मानकर म्हणाले, नागरिकांना पाण्याची कमी जाणवू नये यासाठी गेली चार महिने टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात होता.  या नवीन टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनी मुळे मेगासिटी मधील कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटला जाणार आहे.  

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये