पुणे शहर

पुण्यातील काही भागाचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद

पुणे: वारजे जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत एस.एन.डी.टी. HLR आणि चतु:श्रृंगी पाईपलाईन जोडणी तसेच चांदणी चौक BPT कडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या मंगळवारी (दि.21) केले जाणार आहे. तसेच कोंढवे धावडे टाकी येथील जलवाहिनी दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे मंगळवारी शहरातील काही भागाचा संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Img 20231109 wa00128330767081325070842

तर बुधवारी (दि.22) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी कळवले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व सहकार्य करावे असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असलेला भाग एस.एन.डी.टी. HLR टाकी परिसर

हॅपी कॉलनी गल्ली क्र. 4, नवीन शिवणे, रामबाग कॉलनी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, केळेवाडी, रामबाग कॉलनी परिसर, एम. आय. टी. कॉलेज परिसर, एल.आय.सी. कॉलनी, रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, शिवतीर्थ नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, कांचनबाग, लिलापार्क, सिल्हरक्रेस्ट ऑर्नेट, सरस्वती रोनक शिवगोरख, चिंतामणी सोसायटी, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, वनाज कंपनी मागील भाग, वृंदावन कॉलनी, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. 1 ते 21, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, मावळे आळी, कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, आनंदनगर, आयडियल कॉलनी, पौड रस्त्याचा भाग, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, डी.पी रस्त्याची डावी बाजू, शिवशक्ती सोसायटी ते 20 ओवस सोसायटी पर्यंत

Img 20230717 wa0012281292712276676815194924

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चतु:श्रृंगी टाकी परिसर –

सकाळ नगर, औंध रोड, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण,निम्हण मळा भाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, स्पायसर कॉलेज,आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत. बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.

सन हॉरीझन, बालेवाडी जकातनाका, ग्रीन झोन टाकी परिसर
मोहननगर, लक्ष्मण नगर, राम नगर-राम इंदू पार्क, बालेवाडी गावठाण,दसरा चौक परिसर, पाटील निगर, शिवनेरी पार्क सन हॉरीझन, हाई-स्ट्रीट परिसर, 43 प्रायवेट ड्राईव्ह,मधुबन सोसायटी परिसर, बिट वाईज परिसर, एफ रेसिडन्सी, पार्क एक्सप्रेस परिसर, आयवरीस टॉवर इ.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

कोंढवे धावडे टाकी परिसर

कोंढवे धावडे गावठाण, खडकवस्ती, 10 नंबर गेट, टेलीफोन एक्सचेंज परिसर,न्यू कोपरे परिसर, उत्तमनगर गावठाण, उत्तमनगर उर्वरित परिसर, देशमुख वाडी,सरस्वती नगर, पोकळेनगर, इंडस्ट्रीयल एरिया, शिवणे गावठाण, इंगळे कॉलनी इ.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये