पुणे शहर
कोथरूड, कर्वेनगर, वारजे आणि अन्य काही ठिकाणी मंगळवारी (दि.8) पाणी पुरवठा बंद राहणार…

पुणे : खडकवासला ते वारजे जलकेंद्र व होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या फेस-१ रॉ वॉटर लाईन, ड्रेनेज मेनलाईनच्या कामात तुटून गळती होत असल्यामुळे सदर वाँटर लाईनची दुरुस्ती करण्यासाठी सदर जलवाहिनी मंगळवार दि. ०८/०४/२०२५ रोजी बंद ठेवावी लागणार आहे.
त्यामुळे वारजे, शिवणे इंडस्ट्रीयल एरिया,कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसलेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड व खडकीचा काही भाग येथील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. सदर कालावधी मध्ये टँकरने केला जाणारा पाणी पुरवठा देणे शक्य होणार नाही, तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






