१०१ विजेत्यांना मिळणार हेलिकॉप्टरने किल्ले सिंहगड पाहण्याची संधी ; विरेश शितोळे आयोजित किल्ले स्पर्धा निकालाची उत्सुकता..

कर्वेनगर : हरवत चाललेल्या परंपरेला उजाळा देण्यासाठी विरेश शितोळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित किल्ले स्पर्धा २०२१ मध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अभ्यासपूर्ण किल्ले बनवले. सहभागी स्पर्धकांच्या किल्ल्यांना भेट देत विरेश शितोळे यांनी त्यांना प्रशस्तीपत्रक देत त्यांचे कौतुक केले. लवकरच या स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
ज्यावेळी किल्ल्यांना भेट दिली त्यावेळी मुलांचा उत्साह पाहून समाधान वाटले. कर्वेनगर, वारजे परिसरातील सहभागी स्पर्धकांनी खूप अभ्यासपूर्वक किल्ले बनविले होते व किल्ल्याची माहिती देताना त्यांनी केलेले परिश्रम दिसत होते. जवळपास सर्वच स्पर्धकांकडून हुबेहूब किल्ल्याची प्रतिकृती करण्यात आली होती. हे पाहून स्पर्धा घेतल्याचे सार्थक झाले असे वाटले अशा भावना विरेश शितोळे यांनी व्यक्त केल्या.
या स्पर्धेतील १०१ विजेत्यांना हेलिकॉप्टरने किल्ले सिंहगड दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तसेच विजेत्यांना इतरही पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा निकाल म्हणजे सहभागी स्पर्धकांसाठी आनंदाची पर्वणी असणार आहे.










