महाराष्ट्र

शक्ती कायद्याचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वागत..


मुंबई : महिला आणि लहान मुलांवरील आत्यचाऱ्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणारा शक्ती कायदा महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज मंजूर करण्यात आला असून या कायद्याचे मी स्वागत करतो. यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेल्या संघर्षाला आज यश मिळाले असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष,आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे

पाटील यांनी म्हंटले आहे की ,गेल्या काही महिन्यांपासून वारंवार उघडकीस येणाऱ्या अत्याचारांच्या नृशंस घटनांना या कायद्यामुळे आळा घालता येणार आहे  महाविकास आघाडी सरकारला एकच विनंती आहे की आतातरी या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित करावी. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी न घालता कठोरात कठोर शासन होईल याची हमी घ्यावी.

Img 20211223 103822
Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये