पुणे शहर

२३ गावांच्या समावेशाबाबत काय म्हणतायत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : २३ गावांच्या समावेशामुळे पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी हद्द असणारी महापालिका झाली असताना आता या गावांचा सर्वांगीण आणि समतोल विकास करणे, याला आमचे प्राधान्य असणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटले आहे. गावांच्या समावेशाबाबत आपली भूमिका मांडताना ३४ पैकी उरलेल्या २३ गावांचा समावेश व्हावा, ही आमची पूर्वीपासूनचीच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. What does Pune Mayor Murlidhar Mohol say about the inclusion of 23 villages?

मोहोळ यांनी म्हंटले आहे की, या २३ गावांच्या समावेशाबाबत पुणे महापालिका प्रसाशनाला राज्य सरकारकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. त्यानुसार या गावांसाठी ९ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाने कळविले होते. त्यानुसार राज्य सरकारने अर्थसहाय्यची तरतूद करावी, म्हणजे या गावांच्या विकासाला चालना मिळेल.

Img 20210630 wa0122

खरं तर ही गावे टप्प्या-टप्प्याने घ्यावीत अशी आमची भूमिका होती. म्हणूनच देवेंद्रजींचे सरकार असताना २०१७ साली ११ गावांचा समावेश केला होता. आताही २३ गावांच्या समावेशाचे आम्ही स्वागतच करतो. पण त्यासोबतच गावांच्या विकासासाठी अर्थसहाय्य करावे. म्हणजे गावांच्या विकासाला लवकर गती देणे शक्य होईल असे मोहोळ यांनी म्हंटले आहे.

Img 20210522 wa0207

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये