पुणे शहर
बाणेर येथून अपहरण झालेला ‘तो’ चिमूकला अखेर सापडला

पुणे : बाणेर परिसरातून चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस कसून त्याचा शोध घेत होते. अखेर हा चिमुकला सापडला आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना तो सापडला.
बालेवाडीमधून चार वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते. त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास 300 वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे. या मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून समजू शकलेले नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.




