कोथरुड

एरंडवण्यातील गणेश मंडळाने सुरू केलेल्या समाजपयोगी वाचनालयावर पालिकेची कारवाई नक्की कशासाठी ? 

सर्वपक्षीय कार्यकर्ते , गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक

कोथरूड : वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील गुळवणी महाराज पथ रस्त्यावर एरंडवण्यातील १० चाळी जवळ एका मंडळाच्या वतीने पदपथावर करण्यात आलेले सार्वजनिक वाचनालय शनिवारी रात्री पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून काढले. या प्रकारामुळे सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते व गणेश मंडळाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

ही कारवाई करत असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याचे पुढे आले असून याबाबत जाब विचारला जात आहे . गुळवणी महाराज रस्त्यावर दहा चाळी जवळ एका ठिकाणी कचरा पडत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी कचरा पडू नये म्हणून श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला मात्र कचरा पडणे थांबत नसल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स्व. कै. अरुण सातपुते यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय सुरू करून एक सामाजिक उपक्रम राबवला व त्यामुळे येथे रस्त्याकडेला पडणार कचरा ही थांबला. रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न सुटल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या कार्यकर्त्यांचे कौतुकही केले होते. या वाचनालयासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने हातभारही लावला होता. मंदार बलकवडे यांच्या वतीने या ठिकाणी सीसी टीव्ही बसवण्यात आले होते तर, शिवा मंत्री, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव अरुण निवंगुने, सुनील म्होकर, बाळासाहेब पानगावकर यांनी वाचनालयासाठी रोजचे सहा पेपर दिले होते.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

मात्र शनिवारी रात्री अचानक या वाचनालयावर वारजे कर्वेनेगर क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.  ही कारवाई करताना कार्यकर्त्यांना मारहाणही करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते व गणेश भक्तांमध्ये असंतोष असून संबधित अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आता केली जाऊ लागली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष करून एक चांगला सामाजिक उपक्रम सुरू असताना त्यावर कारवाई कशी केली जाते ? या कारवाई मागे नक्की कोण आहे ? असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

मंदार बलकवडे म्हणाले, गणेश मंडळाचे कार्यकर्ते कायम समाजहिताची कामे करत असतात. यातूनच श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी पुढे येत रस्त्याकडेला पडणार कचरा प्रश्न सोडवण्यासाठी वाचनालय सुरू केले. यातून महापालिकेलाच सहकार्य मिळाले. पण त्याकडे दुर्लक्ष करून जर कारवाई केली जात असेल तर ते चुकीचे आहे. यामुळे समाजासाठी काहीतरी चांगले करण्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या तरुण  कार्यकर्त्यांच्या मनात चुकीचा संदेश जाऊ शकतो. नक्की ही कारवाई ऑनलाईन तक्रारीमुळे करण्यात आली का ? का या मागे वेगळे काही कारण आहे याबाबत सर्वांच्याच मनात शंका आहे. 

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192

आज सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी व गणेश भक्तांनी वारजे कर्वेनगर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांची भेट घेऊन त्यांना याबाबत जाब विचारत संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना सांगितले की, या वाचनालयाबाबत ऑनलाईन तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे ते काढून घेण्यात यावे याबाबत त्यांना सांगण्यात आले होते. मात्र ते काढण्यात न आल्याने पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर अतिक्रमण विभागाने वाचनालय काढून घेतले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सकारात्मक काम केले होते, त्यांचा उद्देश चांगला होता पण त्यासाठी त्यांनी कोणती परवानगी, मान्यता घेतलेली नव्हती. तक्रार आल्याने कारवाई करावी लागली.  ही कारवाई करत असताना कोणाला मारहाण झाली असेल तर त्याबाबत चौकशी करून तथ्य निघाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये