पुणे शहर

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे :  विद्यापीठ चौकातील नियोजित मेट्रो उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यापूर्वी तेथे वाहनचालकांसाठी सध्याच्या मार्गासोबत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्दीनुसार वाहतूक नियोजनावर भर देण्याचे ठरले.

पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल व परिसरातील वाहतूक विषयक विविध समस्या सोडविण्याकरिता स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयामध्ये सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱयांची बैठक काल दिनांक ११ सप्टेंबर ला बोलावली होती. उड्डाणपुलाचे काम 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून तो सुरु करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली.

Img 20230717 wa0012281291948762095496285435

उड्डाणपूलाचे काम गतीने करताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची सुद्धा यावेळी चर्चा झाली. नागरिकांनी केलेल्या विविध सूचनांही यावेळी विचारात घेण्यात आल्या.

पीएमआरडीए महानगर आयुक्त श्री. राहुल महिवाल, श्री. विवेक खरवडकर, पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. विजयकुमार मगर, पुणे मनपा पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. दिनकर गोजारे, टाटा कंपनीचे प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी चौक, नियोजित पर्यायी मार्ग यांची जागा पाहणी केली.

चौकात बाणेरच्या बाजूला सध्या सुरू असलेल्या खांबांचे काम लवकर केल्यास, औधच्या बाजूला पुलाचा रॅम्प बांधण्यास परवानगी देण्याचे वाहतूक पोलिसांनी मान्य केेले. त्यामुळे, 15 ऑक्टोबरनंतर ते काम सुरू होईल. महापालिकेच्या अधिकाऱयांनीही रस्ता रुंदीकरण जलद गतीने करण्याचे मान्य केले. विद्यापीठाच्या आवारातून रेंजहिल्सकडे जाण्यासाठी दुचाकी वाहनांना स्वतंत्र मार्ग देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. यावेळी पीएमआरडीए महानगर आयुक्त श्री. राहुल महिवाल, श्री. विवेक खरवडकर, पुणे शहर वाहतूक पोलीस उप आयुक्त श्री. विजयकुमार मगर, पुणे मनपा पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. दिनकर गोजारे, टाटा कंपनीचे अधिकारी आदि उपस्थित होते.

Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20221228 wa0001282294128958397815578022
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये