पुणे शहर

विजयानंतर २४ तासांत नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांची नागरिकांना भेट व प्रत्यक्ष कामाला सुरुवात

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११, रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर येथील नवनिर्वाचित नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी नागरिकांनी दिलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत, विजयानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नागरिकांच्या भेटी घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

निवडणुकीनंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने भेटी देत परिसरातील विविध समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, वाहतूक व इतर मूलभूत सुविधांबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन संबंधित विभागांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

Img 20251125 wa01782121520512185783132

नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले, “प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. निवडणूक संपल्यानंतर वेळ न दवडता लोकाभिमुख व पारदर्शक कारभाराची सुरुवात केली असून, प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जाईल.”

रामबाग कॉलनी व शिवतीर्थनगर परिसराचा सर्वांगीण विकास, स्वच्छ व सुरक्षित वातावरण तसेच नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम केले जाईल, असा विश्वासही यावेळी मानकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये