भाजपचे किरण दगडे पाटील कोथरूड मध्ये येत असलेल्या सहा प्रभागांमध्ये सर्वाधिक मतांच्या फरकाने विजय झालेले उमेदवार..

त्यांच्यानंतर कोण आहेत 2 व 3 नंबर वर सर्वाधिक फरकाने विजय झालेले उमेदवार कोण ?
कोथरूड : पुणे महानगर पालिका निवडणुकीचा निकाल काल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. या निकालात कोथरूड भागात पुरुष गटात सर्वाधिक मतांच्या फरकाने कोणी विजय मिळवला याबाबतची उत्सुकता सर्वांना आहे.
कोथरूड मध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण, प्रभाग क्रमांक 10 भुसारी कॉलनी बावधन, प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी शिवतीर्थनगर, प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी, प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर होम कॉलनी, प्रभाग क्रमांक 31 कोथरूड मयुर कॉलनी या एकूण सहा प्रभागांमध्ये मोठ्या लीडने कोण निवडून आले असेल याची चाचपणी केली.
हाती असलेल्या मतांच्या आकडेवारीनुसार कोथरूड मधील प्रभाग क्रमांक 10 बावधान भुसारी कॉलनी मधून भाजपचे किरण दगडे पाटील यांनी सर्वाधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला असल्याचे स्पष्ट होत आहे. किरण दगडे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत दगडे पाटील यांचा 20 हजार 28 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. किरण दगडे पाटील यांना 29 हजार 211 मते मिळाली तर अभिजित दगडे पाटील 9 हजार 183 मते मिळाली आहेत.
किरण दगडे पाटील यांच्या नंतर मतांच्या लीड मध्ये 2 नंबरवर आहेत, प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना हॅप्पी कॉलनी मधून भाजपचे पुनीत जोशी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत 19 हजार 594 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. पुनीत जोशी यांना 24 हजार 584 मते तर ठाकरे शिवसेनेच्या वैभव दिघे यांना 4 हजार 990 मते मिळाली आहेत.
मतांच्या मोठ्या लीड ने विजय झालेल्या उमेदवारांमध्ये तीन नंबरवर आहेत भाजपचे पृथ्वीराज सुतार. त्यांनी मनसेचे किशोर शिंदे यांचा 16708 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. पृथ्वीराज सुतार यांना 26 हजार 810 तर किशोर शिंदे यांना 10 हजार 102 मते मिळाली आहेत.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कोथरूड भागातून कोण सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. प्रभाग क्रमांक १० बावधान भुसारी कॉलनी मधून किरण दगडे पाटील चांगले मतदान घेतील अशी चर्चा होती. ही चर्चा खरी ठरवत त्यांनी मोठ्या आणि सर्वाधिक मतांच्या फरकाने विजय संपादित केला आहे. प्रभागातील मतदारांशी ठेवलेला संपर्क, मार्गी लावलेले प्रलंबित प्रश्न, कोविड मध्ये लोकांच्या उपचारासाठी उभे केलेले कोविड सेंटर, महिलांसाठी राबविलेले विविध उपक्रम या जोरावर त्यांनी हा मतांचा मोठा टप्पा गाठला असल्याचे दिसत आहे.






