कोथरुड

पर्यावरणपूरक गणेश मुर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन ; कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचा उपक्रम..      

कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ” स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२१” अन्वये  सेवा सहयोग फौंडेशन, जनवाणी सहकारी संस्था व कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवाचे औचित्य साधून लक्ष्मीनगर वसाहती मध्ये शाडू मातीपासून गणेश मुर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ही कार्यशाळा लक्ष्मीनगर मधील नागेश्वर मित्र मंडळाच्या समाज मंदीरात घेण्यात आली. या कार्यशाळेत वस्ती विभागातील एकूण ६२  विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून गणेश उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी “पर्यावरण पूरक शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मुर्तींची प्राण प्रतिष्ठा करा आणि आपल्या लाडक्या गणेशाचे विसर्जन घरच्या घरीच करा. असा संदेश देण्यात आला.

Img 20210910 wa0274

पुणे शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळा, नदी, नाले व विहिरी हे पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच जल प्रदुषण, हवा प्रदुषण मुक्त पुणे शहर करण्यासाठी आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचे विसर्जन घरीच करून ते पाणि आपल्या झाडांच्या बुंध्यात व कुंड्यातील फुलांच्या झाडांना टाका. तसेच आरोग्याला विघातक व पाण्यात न विरघळणाऱ्या गणेश मुर्त्या तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करू नका”. याबाबत कार्यशाळेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सदर कार्यशाळेत सहभागी  घेतलेल्या मुलामुलींनी शाडू माती पासून अतिशय उत्कृष्ट गणेश मुर्ती तयार करून त्याच मुर्तींची प्राण प्रतिष्ठा आपल्या घरात करणार आहेत शिवाय आपल्या शेजारी देखील तयार करून देण्याचा व शाडू मातीच्याच विघ्नहर्त्याची प्राण प्रतिष्ठा करण्याचा आग्रह आम्ही धरणार आहोत अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

सदर कार्यशाळेचे आयोजन महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक सचिन लोहोकरे, करण कुंभार, मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे सेवासहयोगचे युवराज चाबुकस्वार, किरण दरवडे, संमिता कुलकर्णी, वैदेही लेले कमिन्सच्या रेणुका कमाले, चिन्मय पाठक व जनवाणीच्या जयश्री पाटील, समीर अजगेकर यांनी परिश्रम घेतले.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये