योगीराज पतसंस्थेला राज्यातील आदर्श पतसंस्था पुरस्कार प्रदान..

पुणे : राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील आदर्श पतसंस्था म्हणून योगीराज पतसंस्थेला “क्षेत्रीय सहकारी उत्कृष्टता पुरस्कार 2021” राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे, नाबार्डचे चीफ जनरल मॅनेजर सी.जी. रावत, मत्सपालनचे विभागीय आयुक्त डॉ.अभय देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी याबद्दल माहिती दिली की, संस्थेने 25 वर्षात आर्थिक क्षेत्रात केलेली प्रगती तसेच सामजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेले समाजकार्य या सर्व बाबींचा विचार करुण राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने सर्व चाचणी करुन संस्थेला पुरस्कार दिला आहे. मिळालेला हा पुरस्कार प.पू.गगनगिरी महाराजांच्या आशिर्वादामुळे तसेच संचालक मंडळाच्या नि:स्वार्थी सेवेमुळे, कर्मचारीवर्गाच्या प्रामाणिक सेवेबद्दल व खातेदारांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासामुळे मिळालेला आहे. मिळालेला हा पुरस्कार सर्वांना समर्पित करतो.
यापूर्वीही संस्थेला राज्यातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत परंतू राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद झाला आहे. राष्ट्रीय सहकार मंडळाने संस्था करीत असलेल्या चांगल्या कामाबद्दल पुरस्कार देवून कौतुकाची थाप टाकल्याणे आमची जबाबदारी वाढली आहे व यापुढे अधिक चांगले काम संस्थेच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे विभागीय संचालक कर्नल विनीत नारायण, संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी उपस्थित होते.




