पुणे शहर

पुण्यातील प्रत्येक शाळेबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्याची युवा सेनेची मागणी

पुणे : पुण्यातील नूमवि प्रशाला येथे झालेल्या शालेय विद्यार्थ्यावर कोयता हल्ल्याबाबत आज पुणे शहर युवा सेने तर्फे पुणे शहरातील प्रत्येक शाळेबाहेर शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळांमध्ये पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांच्या गस्तीचे नियोजन करण्यात यावे. या बाबत निवेदन आज पुणे शहर युवा सेनेतर्फे पोलीस उपायुक्त यांना  देण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थी हिता संदर्भात आणखीन काही निर्णय घेता येतील या बाबत चर्चा करण्यात आली. या प्रसंगी युवासेना पुणे शहर युवासेनेचे पदाधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख, परेश खांडके, चेतन चव्हाण, शुभम दुगाने, शुंशात पोकळे, सागर दळवी, नीरज नांगरे हे उपस्थित होते.

Img 20221228 wa0001281294015812215888080109

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये