शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात दिलासा नाही ; कोठडीत वाढ

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई कोर्टातून आर्यन खानला आज जमीन मिळेल अशी चर्चा होती, पण त्याच्या कोठडीत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आल्याने शाहरुख खानला हा मोठा धक्का मानला जात आहे.
अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत पार्टीत सहभागी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर काल रविवारी त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात होते. न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसाची कोठडी सुनावली होती. जी आज संपली.
आज पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात
आल्यानंतर त्याच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ
करण्यात आली आहे. आर्यन खान गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेतो असा दावा एनसीबीने केला असल्याची माहिती मिळत असून त्याच्या मोबाईलमधून काही धक्कादायक माहितीसमोर आल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी केला
होता. ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी एन सी बी च्या वकिलांनी केली होती. ती कोर्टानं मंजूर करत आर्यनच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.




