कोथरुड

कोथरूडमध्ये एकाच छताखाली विविध शासकीय दाखले व शासकीय योजनांची कामे झाल्याने नागरिकांमध्ये समाधान…

२ हजार नागरिकांनी घेतला शासन आपल्या दारी शिबिराचा लाभ..

कोथरूड :  शासन आपल्या दारी आल्याचा खराखुरा अनुभव कोथरुडकरांना कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक चौकात घेण्यात आलेल्या शासन आपल्या दारी शिबिराच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. तीन दिवस घेण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांनी प्रचंड गर्दी करत आपली शासकीय कामे करून घेतली.

भाजप पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ यांनी या शिबिराचे शिस्तबद्ध आयोजन केल्याने गर्दी होऊनही नागरिकांची कोणतीही गैरसोय झाली नाही. या उपक्रमात शासनाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या, जिथे सेवा मिळवण्यासाठी कुठलीही धावपळ, अडचण किंवा विलंब न होता सहज, सुलभ आणि तत्काळ सेवा दिल्या गेल्या.

Fb img 17546380998527994707544766719320

या शिबिरामुळे विविध प्रकारचे दाखले, शासकीय योजना, शासकीय योजनांची ओळखपत्रे, रेशन कार्ड आधार कार्ड संदर्भातील कामे,HSRP एच एस आर पी  नंबर प्लेट नोंदणी अशी कामे नागरिकांना करून घेता आली. साधारण २००० पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाला भेट देत उत्तम नियोजनाबाबत आयोजक दुष्यंत मोहोळ यांचे कौतुक केले.

Img 20250508 wa0001235733770892078245

कोथरूडमध्ये दिनांक ४ ते ६ ऑगस्ट या काळात पार पडलेला ‘शासन आपल्या दारी’ हे शिबिर पार पडले.  या शिबिरात उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, डोमसाईल दाखले, ईडब्ल्यूएस व नॉन क्रिमीलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र शपथपत्र / अ‍ॅफिडेव्हिट, रेशनकार्ड सेवा, आधारकार्ड सेवा, समाजकल्याण योजनांतर्गत सेवा, HSRP नंबर प्लेट नोंदणी या संदर्भातील कामे २ हजार पेक्षा जास्त नागरिकांना करून मिळाली.

या उपक्रमाबाबत नागरिकांनी समाधान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गरजू नागरिकांच्या सोयीस अनुकूल ठरली. शासनाच्या कामकाजाबद्दलचा विश्वासही नागरिकांच्या मनात या निमित्ताने रुजला गेला. तीन दिवसांत कोथरूडमधील हजारो नागरिकांनी या उपक्रमास दिलेला भरघोस प्रतिसाद हा केवळ विश्वास नव्हता, तर आमच्यावर सोपवलेली जबाबदारी होती
आणि ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडली याचा अभिमान आणि समाधान असल्याची भावना आयोजक भाजप पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. 

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये