राष्ट्रीय
“ नववर्षाचा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांचा”; पंतप्रधान मोदींची घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटद्वारे नव्या वर्षातील पहिला दिवस देशाच्या अन्नदात्याला समर्पित करणार असल्याचे म्हटले आहे. यानुसार 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.




