पुणे शहर

पुण्याजवळ दिघीत औरंगाबाद, नगरला पाठवण्यात येणारा मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे : दिघी येथील कुरिअर कंपनीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या शस्त्रसाठ्यात तब्बल 97 तलवारी, दोन कुकरी आणि 9 म्यान असा एकूण तीन लाखांपेक्षा अधिक किमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

औरंगाबाद आणि अहमदनगर येथे ही शस्त्रे जाणार होती. मात्र त्याअगोदर पोलीस तिथपर्यंत पोहचले आणि हा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी उमेश सूद (पंजाब), अनिल होण (औरंगाबाद), मनिंदर (पंजाब), आकाश पाटील (अहमदनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद येथे एका कुरिअर कंपनीमधूनही मोठ्या प्रमाणावर शस्त्र जप्त करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यामुळे या कुरिअर कंपन्यांमध्ये नेमकं चालतं तरी काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये