पुणे शहर

इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांची पुन्हा दादागिरी; बाऊन्सर्सने पालकांना रोखले


पुणे : बिबवेवाडीत शाळेतील बाऊन्सर्सकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता उंड्री भागातील शाळेतही असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. युरो शाळेत गेलेल्या पालकांना प्रवेश शुल्काच्या मुद्द्यावरुन अडवणूक करण्यात आली. पालकांनी यावेळी आमच्या मुलांना शाळेत प्रवेश का दिला जात नाही असा जाब प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी बिबळेवाडीत क्लाइन मेमोरियल शाळेत पालकांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. यानंतर शिक्षणमंत्र्यांनी शाळेत बाऊन्सर्स न ठेवण्याचे आदेश दिले होते. पण त्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं दिसत आहे. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शाळेने मेलद्वारे दाखले पाठवले होते. यानंतर पालक शाळेत पोहोचले होते. पालकांना बराच वेळ गेटबाहेर थांबवून ठेवण्यात आलं होतं. यावेळी कोणतीही माहिती दिली जात नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये