पुणे शहर

कर्वेनगर परिसरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या २ शाखांचे उद्घाटन

पुणे : कर्वेनगर येथील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या २ शाखांचे भव्य उद्घाटन आज पार पडले. कॅनल रोड चौक कमिन्स कॉलेज जवळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दोन ठिकाणी स्थित असलेल्या या शाखांचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष हर्षवर्धन मानकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला हजेरी लावून युवांनी व इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे,कर्वेनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे काम या शाखांच्या माध्यमातून होणार असल्याची खात्री असल्याचे कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले. यावेळी स्थानिक युवा नेते स्वप्निल दुधाने म्हणाले की येत्या १५ दिवसात कर्वेनगर परिसरामध्ये आणखीन १५ नवीन शाखांचे भव्य उद्घाटन करणार असल्याचे शब्द त्यांनी कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांना दिले.

कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरुनानी आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती.

याप्रसंगी शहर युवक कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, बंडु तांबे, संतोष बराटे, रेश्मा बराटे, पल्लवी शेडगे, निलेश शिंदे, धनंजय पायगुडे, समीर बराटे, मोहित बराटे, किशोर शेडगे, मधुकर भगत, वैभव कोठुळे, पुष्कर भिलारे, तेजस भागवत, श्रीकांत बालघरे, ऋषिकेश कडू, विजय बाबर, आशिष शिंदे, लखन सौदागर, शशांक काळभोर,अमोल गायकवाड,मंगेश भोंडवे,प्रीतम पायगुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये