पुणे शहर

कालवा समितीच्या बैठकीतून खासदार गिरीश बापट यांचा संतापून सभात्याग…..

पुणे : आज पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी बैठक सुरू असताना सभात्याग केला प्रशासनावर नाराजी व्यक्त करत पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बापट यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली या मध्ये संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा व्हावा. अश्या सूचना खासदार गिरीश बापट यांनी केल्या. त्यावर उपाययोजना करू असे आश्वासन संबंधीत अधिकाऱ्यांनी दिले.त्यावर फक्त आश्वासन देऊन काम चालणार नाही पुण्याला समान पाणीपुरवठा झालाच पाहिजे या करता आंदोलन करावे लागेल.

सध्या पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे लोकांचे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का असा प्रश्न खासदार बापट यांनी विचारला पुढील तीन दिवसांमध्ये पाणीप्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये