महाराष्ट्र

1 मे पासून दाढी आणि कटिंग दरामध्ये मोठी वाढ होणार…

मुंबई : वाढच्या महागाईमुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला केवळ कात्री लागत नाही तर अक्षरश: खिसा कापला जातोय. पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिवसेंदिवस भरमसाठ वाढ
होतेय. भाजीपाल्यासह रोजच्या गरजेच्या वस्तूंमध्येही मोठी वाढ होत आहे. अशावेळी सर्वसामान्यांशी संबंधित आणि महागाईच्या  झळा सोसायला लागणार आहे. कारण, मुंबईसह देशभरात दाढी आणि केस कापणं महाग होणार आहे.

मुंबईत आज सलून, ब्युटीपार्लर कामगार युनियनची बैठक पार
पडली. त्या बैठकीत हा दाढी, केस कापण्याच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे वाढलेला कौटुंबिक खर्च आणि व्यावसायिक खर्च, सलून सेवेचे भाव याचा योग्य ताळमेळ बसवण्यासाठी 1 मे 2022 रोजी कामगार दिनाचं औचित्य साधून संपूर्ण भारतभर कुशल सलून
सेवकांच्या सलून सेवा भावात वाढ केली जाणार आहे.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दाढी, कटिंगच्या दरात 50 टक्के भाववाढ लागू करण्याचा निर्णय मुंबई आणि महाराष्ट्राच्या बैठकीत घेण्यात आलाय. तर अर्धकुशल सलून सेवकांच्या दरात 30 टक्के भाववाढ जाहीर करण्यात आली आहे. सलून,ब्युटीपार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. वाढत्या महागाईमुळे सलूनमधील कामगारांना कौटुंबिक खर्च भागवणं कठीण जात आहे. त्यामुळे ही भाववाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलंय.

Fb img 16504250884693500455106425966004
Img 20220419 wa0007968353280963622575
Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये