महाराष्ट्र

पुणे-नगर मार्गावर 1 जूनपासून गारेगार ई-एसटी ‘शिवाई’

पुणे : पुणे-नगर मार्गावर 1जून 2022 पासून पहिली ई-एसटी म्हणजे ‘शिवाई’ सुरु करण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. ई-बससाठी पुणे हे राज्याचे बेस स्टेशन असणार आहे.

पुण्याहून तब्बल 150 ई-बस राज्याच्या विविध शहरांत धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा अनेक शहरात होणारा प्रवास सुखद, गारेगार आणि आल्हाददायक होणार आहे. ही बस संपूर्ण वातानुकूलित असून शिवशाहीच्या तुलनेने ‘शिवाई’चे तिकीट दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना देखील शिवाईने स्वस्तात प्रवास करणे शक्य होणार आहे. पुण्यातील चार्जिंग स्टेशनमध्ये 30 चार्जर असल्याने एकाच वेळी 30 बसचे चार्जिंग होणार आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

राज्यात पहिली एसटी 1 जून 1952 रोजी नगर-पुणे अशी धावली होती. त्याचेच औचित्य साधून एसटी प्रशासनाने 1 जून 2022 रोजी पुणे-नगर अशी ई-एसटी सोडण्याचे नियोजन केले आहे. नगरमध्ये चार्जिंग स्टेशन नसल्याने पुण्याहून नगरसाठी एसटी धावणार आहे. त्यामुळे 70 वर्षांनंतर आता एसटीमध्ये ई-बसच्या रूपाने नवीन अध्याय सुरु होत आहे. पुणे-मुंबई आणि पुणे-अहमदनगर-औरंगाबाद या मार्गावर एसटीच्या वातानुकूलित बससेवेला मोठा प्रतिसाद आहे.

बस चार्ज झाल्यावर सुमारे 300 किलोमीटरपर्यंत धावणार आहे. घोरपडी व गुलटेकडी या सबस्टेशनपासून चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा होणार आहे. चार्जिंग स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. पुण्यात स्टेशन विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे.

Img 20220507 wa0003

या शहरांसाठीही ई-एसटी ‘शिवाई’ची गारेगार सेवा

पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व नांदेड शहरांत एसटीचे चार्जिंग स्टेशन असतील. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, पुणे-महाबळेश्वर, पुणे-औरंगाबाद या प्रमुख शहरांसाठी पुण्याहून एसटी धावणार आहे. 

Img 20220507 wa0000
Img 20220507 wa0002 1
Img 20220507 wa0001 1
Img 20220507 wa0002
Img 20220507 wa0001
Img 20220508 wa0124

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये