महाराष्ट्र

माझा नातूही अयोध्येत होता, हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही : शरद पवार

कोल्हापूर : आतापर्यंत लोकांच्या प्रश्नासाठी चळवळी व्हायच्या. सामान्य लोकांचे प्रश्न महागाई, बेकारी, कायदा-सुव्यवस्था आहेत. हे सगळे प्रश्न बाजूला राहिले आणि अयोध्येच कायं झालं, प्रार्थना म्हणा सुरु आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना मुलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आलं असल्याने लोकांचं लक्ष वळण्यासाठी या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली जात आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आणि त्याला भाजप खासदाराकडून होणाऱ्या विरोधासंबंधी विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणाले की, “हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. माझा नातूही काल अयोध्येत होता”.

शरद पवार म्हणाले की, “कोणाचं आर्थिक नुकसान होत नाही, पण भावनांचा प्रश्न आहे. शिर्डीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सकाळी प्रार्थना होते. या निर्णयामुळे ती प्रार्थना बंद झाली. लोक हे चालू करा सांगत आहेत. काही लोकांची भावनेची केंद्रं असतात. अनेक काळापासून सुरु असलेल्या पद्धती सुरु राहाव्यात असं त्यांना वाटत असतं. एखाद्या गोष्टीमुळे त्या बंद झाल्या तर त्याचे परिणाम दिसतात आणि महाराष्ट्रात ते उमटू लागले आहेत”.

नळस्टॉप चौकातील उड्डाणपुल पाडवा : दीपक मानकर यांनी साधला भाजपवर निशाणा..
Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये