राजकीय

शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे

मुंबई: अवघ्या काही तासांपूर्वी शिवसेनेकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आलेली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपांखाली आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचे उपनेतेपद काढून घेण्यात आले होते..आता हा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेकडून (Shivsena) यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. 

आज दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सामना दैनिकामध्ये मध्ये छापून आलेली बातमी अनावधानाने छापून आलेली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेमध्येच कार्यरत आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यलयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. त्यामुळे हा आदेश नेमका कोणाकडून काढण्यात आला होता, याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आढळराव पाटील यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात होते. आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देणारे ट्विट केले होते. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असे या ट्विटमध्ये म्हटले होते. हेच ट्विट आढळराव पाटील यांच्यावरील कारवाईस कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात होते. मात्र, अवघ्या काही तासांमध्ये या आदेशात तथ्य नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार नक्की कोणत्या गैरसमजातून किंवा अन्य कारणाने घडला, याविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये