महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन मोठ्या घोषणा

मुंबई : भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारनं 164  सदस्यांचा पाठिंबा मिळवत विधानसभेतील बहुमत चाचणी आज जिंकली. विधानसभा अध्यक्ष निवडीपाठोपाठ बहुमत चाचणी जिंकून सरकारनं विरोधी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आणि पहिला टप्पा पार केला. मुख्यमंत्र्यांनी समारोपाच्या भाषणावेळी तीन मोठ्या घोषणा केल्या.  राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केलाय. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी  21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरीलल व्हॅट कमी करण्याचा  निर्णय
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल. त्यामुळे त्याचा फायदा हा राज्यातील जनतेला होणार आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे.

Img 20220621 wa00078738131563619319629

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा.  जलयुक्त शिवार सारथे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये