अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, भोर विभागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

भोर : भोर सारख्या गावातुन व आजूबाजूच्या खेड्यातून शिकण्याच्या इर्षेने आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत 85% पेक्षा जास्त गुण मिळवले व आपल्या गावाचे, शाळेचे नाव उंचावले ही अभिमानास्पद गोष्ट असल्याने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,भोर विभागाच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याला महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गोविंद कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे, सत्यजित कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, सुनील शिरगांवकर, कमलेश जोशी, राहुल जोशी हे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी यावेळी महासंघाचे ध्येय उद्दिष्टे व आगामी ब्रह्मद्योग उपक्रमाची माहिती दिली. तर डॉ. उदय जोशी यांनी विद्यार्थ्यांना पुढील करिअर बद्दल मार्गदर्शन केले. सत्यजित कुलकर्णी यांनी आत्मनिर्भर उद्योजक व उद्योग विकास योजना याबद्दल माहिती दिली. मंदार रेडे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना जिंकण्याची जिद्द अंगी बाळगण्याची व आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन तालुका अध्यक्ष चेतन पुराणिक, उपाध्यक्ष मंदार पैठणकर व अमेय कुलकर्णी यांनी केले व यात पोतनीस, श्रीकांत देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, रमेश आडकर, अनेक महिला, पुरुष पदाधिकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाला भोर भागातील अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सूर्यकांत मूथल, वृषाली पोतनीस व आभार मनीषा कुलकर्णी यांनी मानले.




