पुणे शहर

वारजेत सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

वासुदेव भोसले व रोहिणी भोसले यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

वारजे :  माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त वारजे येथे ६१ देशी वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले. भाजप ओबीसी आघाडीचे पुणे शहर सरचिटणीस वासुदेव भोसले यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वारजे डूक्करखिंड येथे पुणे महानगरपालिका आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उभे राहत असलेल्या स्मृती  वनामध्ये हा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. खडकवासला मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते वड आणि पिंपळ या देशी झाडाचे रोपण करून वृक्ष रोपणाची  सुरवात करण्यात आली.

यावेळी वनाधिकारी प्रदीप संकपाळ, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, सुभाष नानेकर , संजय वाल्हेकर, अभिजित धावडे, उमेश सरपाटील, रमेश धावडे, सचिन कांबळे ,हेमंत बोडके, सचिन बोऱ्हाडे, अभिजित निंबाळकर, संदीप यादव आदी उपस्थित होते. वारजे परिसरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन वड,पिंपळ,जांभूळ,कडू लिंब, आपटा अशी ६१ झाडे लावली. वारजे हायवे परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवा यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन रोहिणी वासुदेव भोसले आणि वासुदेव शिवाजी भोसले यांनी केले होते.

Img 20220708 wa00011330202002021897215
Img 20220801 wa00256485809293413823063

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये