पुणे शहर

चांदणी चौकात भरधाव वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

पुणे : मुंबई बंगलोर महामार्गावरील चांदणी चौकात भरधाव वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

भीमा पंढरीनाथ दाभाडे (वय २८, रा. मातोश्री निवास, संत तुकारामनगर, पिंपरी) असे या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा भाऊ अर्जुन दाभाडे (वय ३२, रा. औरंगाबाद) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा दाभाडे हे अमुल दुध संघ, येरवडा येथे खासगी कंपनीत काम करीत होते.
त्यांच्याकडे पाषाण, बाणेर , बालेवाडी व कात्रज अशा परिसराची जबाबदारी आहे.

ते मंगळवारी सकाळी ७ वाजता मोटारसायकलवरुन मुंबई -बंगलोर महामार्गावरुन कात्रजच्या दिशेने जात होते. त्यावेळी आय टी पार्कच्या पुढे पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना ससून रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला असून वारजे पोलीस तपास करीत आहेत.

Img 20220908 wa00044659491928105995052

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये