पुणे शहर

कोथरुडमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे.900 कुस्तीगीर यांच्या सहभागात डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे.अशी माहिती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

33 जिल्ह्यातील 11 महापालिकांमध्ये 45 तालीम संघातील 900 मल्ल स्पर्धेत होणार सहभागी होणार आहेत.नामांकित 40 मल्ल सुद्धा घेणार या स्पर्धेत भाग घेणार आहेत.स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान करणार असून डिसेंबर महिन्यातील 6 दिवस ही स्पर्धा होणार आहे. यंदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मान पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थाई समितीचे अध्यक्ष श्री. संजय सिंग जी यांच्याकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचे पत्र मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारले आहे. स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा सुरु झाली आणि आज मोठ्या शिखरावर पोहोचली. आम्हा मोहोळ कुटुंबियांकडे या स्पर्धेची जबाबदारी आली, ही निखळ समाधान देणारी बाब आहे अशी भावना मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

Img 20220910 wa0003

या प्रसंगी श्री. आण्णासाहेब पठारे, अर्जुन पुरस्काराने सन्मानित पै. काकासाहेब पवार, माजी आमदार श्री. बापुसाहेब पठारे, पै. हनुमंत गावडे, पै. विलास कथुरे, हिंद केसरी योगेश दोडके, विजय बराटे, पै. संदीप भोंडवे, पै. वैभव लांडगे, पै.शंकर कंधारे, पै. नामदेव लंगोटे, पै. माऊली मांगडे, पै. संदीप गरुड आणि  पदाधिकारी, कुस्तीगीर उपस्थित होते.

महाराष्ट्र कुस्तगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस साहेब यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊन स्पर्धेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे मोहोळ यांनी सांगीतले.

Img 20220913 wa0008

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये