महाराष्ट्र

जालन्यात दोन गटात दगडफेक, गोळीबार

जालना : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कमान लावण्याच्या वादातून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून पोलिसांना नाईलाजास्तव हवेत गोळीबार करावा लागला आहे. एका व्यक्तीला ही गोळी लागून तो जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शस्त्रक्रिया करुन बंदुकीची गोळी बाहेर काढण्यात आली आहे. भोकरदन तालुक्यातील राजूर जवळील चांदाई एकको गावात ही घटना घडली आहे. 

गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. याबाबतची माहिती मिळताच पोलीस मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड स्वत: घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पण या गोळीबारात 35 वर्षीय व्यक्ती विलास तळेकर हे जखमी झाले. त्यांच्या हाताला गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं . रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हाताला लागलेली गोळी बाहेर काढली आहे. शस्त्रक्रिया सुरु असताना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, आता रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. आदिनाथ पाटील यांनी दिली.

राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी गावात तैनात करण्यात आली आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झालं आहे. उपविभागीय दंडाधिकरी यांनी गावात सकाळपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे. 

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये