खडकवासला धरणातून 30 हजार क्यूसेक पाण्याचा मुठा नदी पात्रात विसर्ग ; नदी काठ परिसरात सावधानतेचा इशारा

पुणे : पुण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून दुपारी एक वाजल्यापासून खडकवासला धरणातून 30 हजार 677 क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात करण्यात येत आहे.
सध्या पावसाचा जोर वाढतो आहे. पुण्यातही आज सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे भिडे पुलावर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भिडे पुलावरची वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. नदीपात्रातील दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर पाणी आल्याने नदीपात्रातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच नागरिकांनीही सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी नदी काठ परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्यात आली आहेत. त्या बरोबरच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



