पुणे शहर

सह्याद्री कुणबी संघाच्या पुणे शहाराध्यक्षपदी सतीश डाकवे तर महीला अध्यक्षपदी अंकिता शिगवण यांची निवड

सह्याद्री कुणबी संघाची कार्यकारणी जाहीर

पुणे : सह्याद्री कुणबी संघाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सतिश डाकवे तर महीला अध्यक्ष पदी अंकिता शिगवण यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या कोअर कमिटीने यावेळी महाराष्ट्र प्रांत व पुणे शहराची पूर्ण नव्याने संघाची कार्यकारणी जाहीर केली आहे.

महिला कार्याध्यक्षापदी वैष्णवी भोज, चिटणीसपदी मिनाक्षी शिगवण व ज्योती घडशी, सरचिटणीस पदी वर्षा घडशी, उपाध्यक्षपदी प्रविण रामाने व संतोष रामाने, प्रसिद्धी प्रमुख पदी प्रदीप सुकम आदींची नव्याने नियुक्ती करण्यात आली. याच निमित्ताने लांजा – संगमेश्वर विभागाच्या वतीने कोथरुड येथे नवनिर्वाचित पुणे शहर अध्यक्ष आणि पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

Fb img 1647413711531 1

यावेळी सहयाद्री कुणबी संघाचे कार्याध्यक्ष- गणपत (दादा) घडशी, महा.प्रांत अध्यक्ष- विलास घडशी, महाप्रांत उपअध्यक्ष- विठ्ठल नाईक, महाप्रांत उपअध्यक्ष- प्रविण भोज, महा.प्रांत सरचिटणीस- अजित शिगवण, जगदीश बडंबे व गीतांजली घडशी आदी मान्यवरांसोबत अभिषेक पानकर, संजय पानकर, संतोष आग्रे, विराज डाकवे हे सह्याद्री सदस्य उपस्थित होते.

सह्याद्री कुणबी संघ हा सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक अशा विवीध क्षेत्रात भविष्यात समाजासाठीच कार्यरत आसेल असे यावेळी नवनिर्वाचीत पुणे शहर अध्यक्ष- सतिश डाकवे यांनी निवडीनंतर सांगितले.

Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये