पुणे शहर


पुण्याच्या माजी महापौर व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची आज प्राणज्योत मालवली. त्या ५७ वर्षांच्या होत्या. 2019 साली कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या आमदार बनल्या होत्या, त्यापूर्वी त्यांनी पुणे शहराच्या महापौर म्हणून काम पाहिले होते. 

पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी ३. ३० च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअर बसून मुंबईत येऊन मतदान केलं. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत. मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात नगरसेवक या पदावरुन केली. त्या चार वेळा पुणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवक होत्या.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये