महाराष्ट्र

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात, नदीच्या पुलावरुन गाडी 50 फूट खोल दरीत कोसळली

साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात जयकुमार गोरे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे रवाना होत असताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी तब्बल 50 फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी 50 फूट खाली कोसळली. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि गाडी 50 फूटांवरुन खाली कोसळली. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यासोबत इतरही तिघं होते त्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयकुमार गोरेंसह इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. पण गंभीर दुखापत झाली आहे.

पुणे जिल्ह्यात गुलाब शेतीवर माईट रोगाचा प्रादुर्भाव व्हॅलेंटाईन डे च्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर संकट. (पहा व्हिडिओ)
Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये