शरद करंडकचा मानकरी ठरला राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरुड मतदार संघ

पुणे : पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने “शरद करंडक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांनी संघ निवडून मतदार संघाच्या अध्यक्षाने कर्णधार पद भूषविले. आठही मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने सर्वच सामने अटीतटीच्या झाले. या प्रथम पारितोषिक कोथरूड विधानसभा मतदारसंघाला मिळाले व दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पर्वती मतदारसंघाला मिळाले तर तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाने पटकावले.

अतिशय रोमांचकारी झालेल्या या स्पर्धेमध्ये कोथरूड मतदार संघाचे बाजी मारली. आदरणीय पवार साहेब हे बीसीसीआय व आयसीसी चे अध्यक्ष होते. पवार साहेबांनी क्रिकेटला चांगले दिवस आणले होते. याचीच स्फूर्ती ठेऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे यांनी सांगितले.
स्पर्धेचा बक्षीस सामरंभ शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन आप्पासाहेब रेणुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळाभाऊ धनकवडे, नगरसेवक युवराज बेलदरे, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, युवक कर्याध्यक्ष, मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, संदीप बालवडकर, युवराज रेणुसे, व युवक पदाधिकारी अनेक मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेचे आयोजन किशोर कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक पुणे शहर व युवक सरचिटणीस मंगेश साळुंके यांनी केले.









