पुणे शहर

त्या विषयाशी आमचा संबंध नाही ; जगदीश मुळीक

अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी दिले स्पष्टीकरण

पुणे : कसबा मतदार संघाचे भाजप मित्र पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार नियोजना संदर्भात आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या वतीने माहिती देण्यात आली. भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून भाजपचा उमेदवारच विजय होणार असा विश्वास यावेळी भाजप नेत्यांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, राज्य प्रवक्ता संदीप खर्डेकर, धीरज घाटे, भरत लगड, नाना भानगिरे, शैलेश चव्हाण, स्वप्नील नाईक, श्रीकांत शिळीमकर, बालाजी पवार असे भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आर पी आय आठवले गट, शिवसंग्राम, रासप, पतीत पावन संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे वाद चव्हाट्यावर आले असून त्याचे पडसाद कसब्या पर्यंत पोहचले आहेत. माहाविकास आघाडीचे नेते उमेदवाराच्या पाठीशी एकत्र येताना दिसत नाहीत. त्यामुळे आमचा विजय नक्की आहे असा दावा माधुरी मिसाळ व जगदीश मुळीक यांनी यावेळी व्यक्त केला. मोदी सरकारच्या सुरू असलेल्या विकास कामांमुळे मतदार आमच्या पाठीशी आहे. ही हिंदू विरुद्ध काँग्रेस अशी लढाई आहे असे मिसाळ म्हणाल्या. सभा, छोटे छोटे मेळावे, पदयात्रा याचे नियोजन झाले असून. शक्ती केंद्र, बूथ नुसार काम सुरू आहे. कसबा हा भाजपचा किल्ला आहे आणि तो कायम राहणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोहोळ म्हणाले, अमित शहा यांचा पुणे दौरा पूर्व नियोजित असून या दौऱ्याचा पोटनिवडणुकीशी कोणताच संबंध नाही. शहा प्रचारासाठी येत असल्याची बातमी पसरली असून ती खोटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभा होणार असून त्याचे नियोजन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

कसब्यात अजित पवार यांचे भाषण सुरू असताना फटाके कोणी वाजवले या प्रश्नावर जगदीश मुळीक म्हणाले याच्याशी आमचा काही संबंध नसून ती आमची संस्कृती नाही. भाजप विरुद्ध अपप्रचार करणे हे विरोधकांचे काम आहे आणि त्यांनी ते सुरू केले आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये