पुणे शहर

पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे नूतन कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे यांचा सत्कार..

कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाने केला सत्कार

पुणे : पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ही संघटना पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छता व कचरा वाहतूक विभागात काम करणाऱ्या कामगारांना संघटीत करून देश पारतंत्र्यात असताना १० डिसेंबर १९४३ साली कॉ. भाऊ पाठक यांनी स्थापन केली. अशा या पारंपारिक ऐतिहासिक वारसा असलेल्या युनियनचे गेली २० वर्षे संयुक्त चिटणीस पदीं कामगार चळवळीचे कार्य करणारे कॉ. मधुकर हरिभाऊ नरसिंगे यांची युनियनच्या कार्याध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

संयमी, सृजनशील कार्यकर्त्याची युनियनच्या महत्वपूर्ण कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्यामुळे कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी कर्मचारी व कामगार यांच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे व वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या हस्ते नूतन कार्याध्यक्ष कॉ. मधुकर नरसिंगे व मावळते कार्याध्यक्ष कॉ. चंद्रकांत गमरे यांचा सत्कार करण्यात आला.

सदर सत्कार समारंभाच्या प्रसंगी युनियनचे विभागीयअध्यक्ष कॉ. राम अडागळे, कॉ. रमेश पारसे, कॉ. करुणा गजधनी, कॉ. जयश्री भिसे, कॉ. शरद भाकरे, कॉ. सविता पारधे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. देवेंद्र भागवत, कॉ. अशोक खुडे, कॉ. वैजीनाथ गायकवाड, कॉ. आण्णा ढावरे, कॉ. लक्ष्मण सोनवणे, कॉ. अशोक कांबळे, कॉ. रामदास पवार व इतर कर्मचारी कायम व कंत्राटी कामगार उपस्थित होते.

युनियनच्या घटने प्रमाणे कार्याध्यक्ष हे पद कामगार चळवळीत काम करणाऱ्या व महानगरपालिकेच्या सेवेत असणाऱ्या अनुभवी कार्यकर्त्याची सर्वानुमते बिनविरोध निवड केली जाते. घटनेतील तरतुदीनुसार कॉ. मधुकर नरसिंगे हे सन १९८९ पासून रोजंदारीवर कचरा वाहतुक विभागात “कचरा मोटार बिगारी” म्हणून काम करत होते तेव्हापासून कचरा कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनासमोर आग्रही भूमिका घेऊन युनियनच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी झाले.

Screenshot 2023 0427 133512172213840565051751

रोजंदारीवर काम करणाऱ्या कचरा खात्यातील कामगांराच्या सेवाज्येष्ठता याद्या तयार करण्यात व कायम करण्या संदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका युनियनच्या माध्यमातून नरसिंगे यांनी पार पाडली. घाणीत काम करणाऱ्या कामगांराना आपल्या हक्क व कर्तव्याची जाणीव करून संघटीत व एकजुटीत करण्याचे काम केले. तसेच महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपात कॉ. मधुकर नरसिंगे यांच्या नेतृत्वाखाली कचरा वाहतुक विभागातील २०० कामगारांचे पथक भूकंपग्रस्तांच्या मदतीला गेले होते. सदर पथकाच्या माध्यमातून भूकंपात मातीच्या ढिगार्‍याखाली गाडलेली व मृत्यू पावलेले प्रेतं काढून त्यांचे अत्यंसंस्कार करण्यापासून ते अडकलेले घरातील साहित्य काढून देणे शिवाय जखमीना दवाखान्यात पोहोचवून जीवदान देण्याचे उल्लेखनिय कार्य पथकाच्या माध्यमातून करण्यात आले.

या पुण्याच्या कामगार पथकाने केलेल्या कार्याचा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी गुणगौरव केले होते. कॉ. मधुकर नरसिंगे यांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही पण दिवसा कचरा गाडीवर घाणीचे काम करून शिवाय शेतात अर्ध वेळ मजूरी घर प्रपंचा चालवत होते. अशा प्रकारे प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रात्र पाळीच्या शाळेत जाऊन ८ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. वयाच्या लहानपणापासून समाज कार्याची आवड व अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची बाणेदार वृत्ती, एकनिष्ठता, समजूतदारपणा, कामगारांचे प्रश्न ऐकून व समजून घेऊन प्रशासन दरबारी युनियनच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात शिवाय कामगारांचे प्रश्न सोडवत असताना महानगरपालिकेचे व कामगारांचे हित देखील साधण्याचा प्रयत्न करत असतात.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये