वारजे माळवाडी, बहुली व हडपसर भागात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..

पुणे : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे विभागाने धडक कारवाई करत हडपसर येथे दारूची वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला तसेच हडपसर येथील काळेपडळ व बहुली येथील गावठी हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापा टाकत मुद्देमाल जप्त करून दारू निर्मितीचे साहित्य नष्ट करण्यात आले. याबरोबरच वारजे माळवाडी येथील दारुसाठा व विक्री केंद्रावर ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त डॉ. श्री. विजय सुर्यवंशी यांच्या हातभट्टीचे समुळच्चाटन करण्याच्या मोहिमेनुसार राज्य उत्पादन शुल्क, पुणे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांच्या हातभट्टी निर्मिती वाहतुक, विक्री विरुध्द मोहिमे अंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली.
हडपसर काळेपडळ गावच्या हद्दीत, रेल्वे गेट, साईबाबा मंदिरासमोरील रोडवर गावठी दारु वाहतुक होणार अशी गुप्त बातमी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी गस्त घालुन बजाज कंपनीचा एम एच -१२, एस के ९७२० तीन चाकी टॅम्पोसह गावठी दारु वाहतुक करणाऱ्या आरोपी अभिषेक उध्दव झगडे, (वय २३ वर्षे, रा. स,नं.३०४/२, म्हसोबा मंदिर समोर, म्हसोबानगर, काळेपडळ, हडपसर) याला
ताब्यातून घेतले. त्याच्याकडून तीन चाकी टॅम्पो व ५६० लि. गावठी दारु असा रु.२,२८,८००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीकडुन मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी काळेपडळ ढेरे कंपनीजवळ गावठी दारु निर्मिती ठिकाणावर छापा मारुन २४०० ली. रसायन, १७५ लि. गावठी दारु व इतर गावठी दारु निर्मिती साहित्य असा ६३,७०० रु. किंमतीचा मुद्देमालासह भट्टी मालकासह इतर २ आरोपी अटक केले. गावठी दारु विक्री व साठा करणारा १ आरोपीस अटक केले. एकूण ०५ आरोपीस अटक करून रु. २,९८,१००/- मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाई बरोबरच हवेली तालुक्यातील बहुली गावच्या हद्दीत मुठा नदी जवळ, मोकळया जागेत,गावठी दारु निर्मिती ठिकाणावर छापा टाकून २ आरोपींना ताब्यात घेऊन ५४०० लि. रसायन व २८० लि. गावठी दारु, २०० किलो तुरटी, १८० किलो नवासागर व इतर गावठी दारु निर्मिती साहित्य असा १,४०,५५०/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार गावठी दारु साठा व विक्री करणारे ठिकाण वारजे माळवाडी गावच्या हद्दीत, अमर भारत सोसायटी, जवळ पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारुन १८५ लि. गावठी दारु असा रु. ९,५००/- चा मुद्देमाल जप्त करुन एका आरोपीस अटक करण्यात आली. वरील तिन्ही आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीचा जामीन नामंजुर करुन तीनही आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.

८ मे २०२३ पासुन आजपर्यंत एकूण ०३ गुन्ह्यात १३८० लि. गावठी दारु, ७८०० लि. रसायन, २०० किलो तुरटी, १८० किलो नवसागर असा एकूण ४,५४,१६० /-किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन अवैध धंद्यात गुंतलेले एकूण ०९ आरोपींवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे ने प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितली आहे.
सदरची कारवाई आयुक्त विजय सुर्यवंशी तसेच सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे, अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत, उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज एस. शिंदे, एस. बी. जगदाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे या पथकाने केली. सदर कारवाईत निरीक्षक तानाजी शिंदे बाळासाहेब नेवसे, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले व जवानस्टाफ एस. बी. मांडेकर, के. आर. पावडे, जी. बी. वाव्हळे, ए. आर. सिसोलेकर यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक तानाजी शिंदे करीत आहेत.






