पुणे शहर

कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी आवारातच स्वतंत्र कोरोना सेंटर उभा करावे. धुमाळ

दिपाली धुमाळ यांनी दिले उपमुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर  छोटे मोठे उद्योगधंदे व्यवसाय सुरू झाले आहे. शेकडो कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपन्या देखील सुरू झाल्या आहेत त्यामुळे औद्योगिक कंपन्या मधील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने कामानिमित्त बाहेर पडत आहे. सद्य परिस्थितीत कंपन्यांमध्ये देखील कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. सध्या पुणे शहरात वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे बेड मिळणे देखील मुश्कील आहे.  त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या आवारातच स्वतंत्र कोरोना सेंटर सुरू करणे आवश्यक असल्याचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

धुमाळ यांनी यासंदर्भातील पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, पुणे शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कोरोना बाधित रूग्णांना वेळेत हॉस्पिटल, ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. बेड्स उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे प्राण गेले आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आवश्यक हॉस्पिटलची संख्या  कमी आहे.
         
प्रत्येक कंपनी मध्ये शेकडो च्या संख्येने कामगार वर्ग आहे. कोरोना बाधित कामगारांना हॉस्पीटल व उपचार वेळेत मिळत नसल्याने  अनेक कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा धोका जर कमी करायचा असेल तर काही ठराविक कर्मचारी असलेल्या कंपनीने आपल्या कोरोना बाधित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी आपल्या कंपनीच्या आवारातच विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, ऑक्सिजन बेड्स व व्हेंटीलेटर बेड्स असलेले कोविड सेंटर उभा करावे व त्याठिकाणी आवश्यक असलेला स्टाफ डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशन व हॉस्पीटल साठी लागणारा कर्मचारी वर्ग त्याठिकाणी ठेवावा. जेणेकरून कंपनीमधील कोरोना बाधित कर्मचारी वर्गावर त्वरीत उपचार होतील.

काही कंपन्यांची अशा प्रकारे विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर, तात्पुरते रुग्णालय उभारण्याची तयारी देखील आहे .अशा प्रकारे ज्या कंपन्या हॉस्पिटलची व्यवस्था करतील त्यांना केंद्र शासन, राज्यशासन किंवा महानगरपालिका  स्तरावरून विशेष सवलत व मदत करावी. या संदर्भात आवाहन करून अध्यादेश काढावा, अशी मागणी धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये