कोथरूडमध्ये एनसीपी कोविड ब्रिगेड हेल्प डेस्क सुरू

कोथरुड : कर्वेनगर येथे राष्ट्रवादी कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या एनसीपी कोविड ब्रिगेड पुणे सिटी हेल्प डेस्क या उपक्रमाचा शुभारंभ माजी उपमहापौर, नगरसेवक दिपक मानकर यांच्या हस्ते व नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार, खासदार वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले की, शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार सर्वसामान्य नागरिकांना कोविड संदर्भात जाणवणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी हा मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. आज साहेबांसारखा ८० वर्षाचा योद्धा या अडचणीच्या काळात कोणतीही तमा न बाळगता महाराष्ट्रासाठी सतत काम करत आहे. पुणे शहरात करोना संसर्ग आटोक्यात आणण्यात महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
स्वप्नील दुधाने म्हणाले की, प्रशासकीय यंत्रणा व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून एनसीपी हेल्प डेस्क काम करणार आहे. करोना संदर्भात आवश्यक असणारी कोविड , नॉन कोविड रुग्णालये, रुग्णवाहिका, तपासणीची ठिकाणे, बिला संदर्भात ऑडिटरचे नंबर , याबाबतची माहिती या हेल्प डेस्क च्या माध्यमातून कोथरूड मतदारसंघांमधील नागरिकांना मिळणार आहे. सर्वसामान्य जनतेला या काळात योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही काम करणार आहोत.
यावेळी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या डॉ. सुनीता काळे, आनंद तांबे, कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष नितीन कळमकर, मिलिंद वालवडकर, संतोष बराटे, बाळासाहेब म्होकर, मधुकर भगत, कोथरूड युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, युवती अध्यक्ष योगिता बावकर, संतोष चव्हाण, राजेश गायकवाड, शुभम माताळे, किशोर कांबळे, वैभव कोठुळे, नंदिनी पानेकर, नंदिनी बडदे, अंजिक्य दुधाने, किशोर शेडगे, श्रुषिकेश कडु, अमित गोंडाबे व कोथरूड मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयाेजन कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने व कार्याध्यक्ष नितीन कळमकर यांनी केले होते.



